ads header

मराठा विरुद्ध कुणबी

आज आरक्षणाच्या बाजने बोलणारे मराठे बोलत आहेत आम्ही कुणबी आहोत. तर विरोध करणारे बोलत आहेत आम्ही मराठा आहोत. म्हणजे मराठा आज ओळखीतच फसला आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळी ३४० कलम लिहले त्यावेळी हा मुद्दा समोर आला होता. 


मागास कोण आहेत असा मुद्दा उठला होता. परंतु ब्राम्हणांनी षड्यंत्र करून मराठ्यांना आपल्या कळपात आणले आणि आपली ताकद वाढवली. राष्ट्रसंत तुकाराम महाराज म्हणाले होते ‘बरेे देवा कुणबी केलो नाही तर दंभेची असतो मेलो’ म्हणजे मी कुणबी आहे. कुणबी कुळात जन्मलो नसतो तर दंभ-अहंकाराने मेलो असतो.मी शुद्र आहे असे त्यांनी सांगितले होते. ब्राम्हणांच्या दृष्टीकोनातून मराठादेखील शुद्र आहे. शाहू महाराजांनीदेखील आपण कुणबी असल्याचे कबूल केले आहे. ब्राम्हणांनी त्यांच्यासाठी पुराणोक्त मंत्र म्हटले. वेदोत मंत्र म्हटले नाहीत. पुराणोक्त मंत्र हे शुद्रासाठी असतात. ब्राम्हण मराठ्याला शुद्र मानतात आणि मराठा स्वत:ला शुद्र मानत नाहीत असे अनेक दाखले मिसाळ-पाटील यांनी दिले.
आज मराठ्यांना ईडब्ल्यूएसचे आरक्षण दिले गेले. म्हणजे त्यांना सवर्ण मानून ब्राम्हणांच्या कळपात पाठवण्यात आले. ईडब्ल्यूएसचे आरक्षण म्हणजे मी त्याला चॉकलेट म्हणतो. त्यामुळे मराठ्यांनी स्वत:ची ओळख मिळवायला हवी. डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि डॉ.पंजाबराव देशमुख यांच्या माध्यमातून मराठ्यांमध्ये जागरण झाले होते. विदर्भातील सारे मराठे हे कुणबी म्हणून ओळख सांगतात. तेथील मराठ्यांनी आपली ओळख कुणबी म्हणून केली आहे. तसे ते लिहतात देखील. ब्राम्हणांनी मराठ्यांच्या कानात नको ती बाब भरवली, त्यामुळे त्याचा सत्यानाश झाला. सत्यशोधक चळवळीला समाप्त करण्यासाठी कुणब्यांचे मराठाकरण करण्यात आले. यशवंत चव्हाण सत्तेवर आल्यानंतर त्याचे प्रमाण जास्त झाले. म्हणजे मूळ ओळख कुणबी संपली आणि मराठा झाले .
Share on Google Plus

About admin

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा